Spread the love

शेतकऱ्याला सिंचन करणे सहज शक्य व्हावे , शिवाय शेतकऱ्यांना विजबिलामधुन कायमचे मुक्त करण्यासाठी टप्याटप्याने 1 लाख सौरकृषी पंप स्थापित करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट्ये आहे .यामध्ये पहिल्या टप्यामध्ये 25,000 दुसऱ्या टप्यामध्ये 50,000 तर तिसऱ्या टप्यामध्ये 25000 सौर कृषी संप स्थापित करण्यात येणार आहेत .याबाबत राज्य शासनाकडुन सुधारित शासन निर्णय दि.01.01.2019 रोजी निर्गमित झालेला आहे .याबाबतचा उद्योग उर्जा व कामगार विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

या सुधारित शासन निर्णयानुसार आर्थिक भारात कोणतीही वाढ न करता लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या सौर कृषी पंपासोबत दोन एलईडी डीसी बल्ब , एक डीसी पंखा व एक मोबाईल चार्जिंग सॉकेट समाविष्ठ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे .या योजनेसाठी निवड करताना अतिदुर्गम भागामधील ज्या ठिकाणी विजेची सुविधा सहज उपलब्ध नाही .अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते .अशा शेतकऱ्यांकडे बोर वेल, विहीर , नदी अशा शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करणे आवश्यक राहील .यासाठी भुजल उपलब्धता नकाशे उपलब्ध करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याची बाब सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत .

ही योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप म्हणुन राबविण्यात येते .सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणत्या आहेत . ते पुढीलप्रमाणे पाहुयात .लाभ घेणारा लाभार्थी हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे बंधनकारक आहे .लाभार्थ्याला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे .महावितरण कंपनीचे ग्राहक असणारे शेतकरी विजबिलामध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातुन सुट घेत असतील असे शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकत नाहीत .

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना संदर्भातील राज्य शासनाचा सुधारित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी