अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देणेबाबतचा सुधारित महत्वपुर्ण शासन निर्णय .

Spread the love

राज्य शासन सेवेत प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासुन रुजु झाल्याच्या दिनांकापासुन तिन वर्षांच्या समाधानकारक सेवा पुर्ण झालेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायीत्व प्रमाणपत्र दिले जाते .याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.11.09.2014 रोजी महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित झाला आहे .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा स्थायित्व प्रमाणपत्र देणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य कर्मचाऱ्यांना प्रथम नियुक्तीच्या पदावर तीन वर्षांच्या नियमित सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यास या प्रमुख शर्तीची पुर्तता करण्याऱ्या कर्मचाऱ्यास स्थायीत्व प्रमाणपत्र देण्यात येते .यामध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्याची नियुक्ती सेवाप्रवेश नियमानुसार व विहीत पद्धतीने झालेली असणे आवश्यक आहे .तसेच कर्मचारी सेवेत पात्र असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्याचबरोबर कर्मचाऱ्यांने सेवाप्रशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .त्याचबरोबर कर्मचाऱ्याचा गोपनिय अहवाल , उपस्थिती , सचोटी चांगली असणे आवश्यक आहे .स्थायित्व प्रमाणपत्र हे प्रथम नियुक्तीच्या पदांकरीता दिले जाते .

सदर शासन निर्णयान्वये प्राधिकारी कार्यालयांकडुन प्रत्येक महिन्यांच्या दि.30 नोव्हेंबर पर्यंत 3 वर्षे पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल तयार करण्यात येतो . अशा कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षांच्या 15 डिसेंबर नंतर स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात येते .सदर स्थायित्वाची नोंद् मुळ सेवापुस्तकामध्ये करण्यात येते .याबाबतचा सामान्य प्रशासन  विभागाचा दि.11.09.2014 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

शासन निर्णय

Leave a Comment