Spread the love

• नमस्कार मित्रांनो, शासन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी नियमितपणे नवनवीन योजना राबवत असते. यासोबतच वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असते. या योजनाचा व कर्जाचा लाभ घेऊन अनेक मित्र आपल्या सर्वांगीण विकासासाठी याचा चांगला उपयोग करत आहे. आज आपण अशाच एका कर्जाबद्दल चर्चा करणार आहोत त्या कर्ज योजनेचे नाव आहे वैयक्तिक कर्ज योजना.

• ही वैयक्तिक कर्ज योजना मागासवर्ग बहुजन कल्याण यांच्या विभागामार्फत राबवण्यात आली आहे या योजनेचा लाभ फक्त मागासवर्गीय लोकांना घेता येईल विशेष म्हणजे ही योजना फक्त आणि फक्त मागासवर्गीय लोकांसाठी बनवण्यात आलेली आहे त्यामुळे जे कोणी मागासवर्गीय लोक असतील ते या योजनेसाठी अर्ज करून कर्ज घेऊ शकते.

• मागासवर्गीय लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आपली चांगली प्रगती करून सर्वांगीण विकास करावा. चला तर मग मित्रांनो बघूया या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती अजून कोणकोणत्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतील व या योजनेसाठी पात्रता काय ठरणार आहे याची विविध माहिती आजच्या लेखामध्ये आपण बघूया.

• योजनेची थोडक्यात माहिती

वैयक्तिक कर्ज योजना याच्या अंतर्गत कर्जाची मर्यादा दहा लाख रुपये पर्यंत असणार आहे आणि बँकेने दिलेल्या या कर्जाला जास्तीत जास्त बारा टक्के पर्यंत व्याज लावले जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा सोबतच अर्जदाराचे वय 18 पासून 50 पर्यंत असावे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपये पेक्षा अधिक असावे. या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाची जी संगणकीय प्रणाली आहे, त्या वरती नोंद करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करणारा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारांनी यापूर्वी या महामंडळाच्या किंवा इतर कोणत्या महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदार हा कोणत्याही बँकेच्या थकबाकीदार नसावा एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकेल.

• या योजनेचा थोडक्यात तपशील बघूया

 • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 50 वर्षे असावे
 • या योजनेचे मेन उद्दिष्ट हेच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय वर्गातील कुशल व गरजू व्यक्तींसाठी पारंपारिक व कृषी संलग्न उपक्रम यासोबतच वेगवेगळ्या उद्योग त्यामध्ये लघुउद्योग मध्यम उद्योग व्यापार विक्री सेवा क्षेत्र इत्यादींची सुरुवात करण्यासाठी
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती नोंदणी करणे अनिवार्य आहे

www.msobcfdc.org

 • लाभार्थ्यांना बँकेमार्फत दहा लाख रुपयांचे कर्ज प्राप्त करून दिले जाईल कर्जाचे हप्ते जर तुम्ही नियमितपणे फेडला तर कर्जावरील 12% व्याज असेल ते तुम्हाला अनुदानाच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावरती जमा होईल
 • लाभार्थ्यांनी उद्योग सुरू केले असल्यास कमीत कमी उद्योगाचे दोन फोटो हे वेबसाईट वरती अपलोड करावेत
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे किमान आठ लाख पर्यंत असेल

• या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची पात्रता काय ठरेल

 • अर्जदार हा महाराष्ट्रातील असून तो मागासवर्गीय प्रवर्गातील असावा
 • अर्जदाराचे वय 18 वर्षापासून पासून 50 वर्षे पर्यंत असावे.
 • अर्जदाराचे आधार कार्ड हे कर्ज खात्याची लिंक असावे
 • महामंडळाच्या वेबसाईट वरती तुमच्या नावाची नोंदणी असणे आवश्यक आहे ( www.msobcfdc.org )
 • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात घ्यावे की इतर महामंडळाच्या किव्हा ह्या महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा
 • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

१) जातीचे प्रमाणपत्र,
२) शिधा पत्रिकेची प्रमाणित प्रत,
३) आधार कार्ड,
४) पॅन कार्ड,
५) पासपोर्ट साईज फोटो
६) उत्पन्नाचे प्रमाणपत्र
७) जन्मतारखेचा दाखला.
८) रहिवासी दाखला / पुरावा, आधार लिंक बॅक खात्याचा पुरावा

अशाप्रकारे करा मित्रांनो ऑनलाईन अर्ज

वैयक्तिक कर्ज योजना या योजनेसाठी अर्ज करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला मागासवर्ग भटक्या विविध जाती या प्रवर्गातील वेबसाईट वरती जावे खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती जाऊ

या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला नोंदणी हा ऑप्शन दिसेल त्यावर ती क्लिक करून तुम्ही नोंदणी करून घ्या

त्यावरती क्लिक केल्यानंतर एक अर्ज ओपन होईल तो अर्ज बिन चुकता व्यवस्थितपणे भरून घ्या

अर्ज भरून झाल्यानंतर म्हणजेच अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर खालील अर्ज प्रस्तुत करणे या बटणावर क्लिक करा

त्यानंतर खाली अर्ज सबमिट या बटणावर क्लिक करा अशाप्रकारे प्रकारे तुमचा अर्ज सबमिट होईल

तुमच्या जिल्ह्याचा जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेबद्दलचे अधिक माहिती जाणून घेऊ शकता

https://schemes.msobcfdc.in/

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी