Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकाबाबत मोठी अपडेट आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता माहे ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वित्त विभागाडुन देण्यात आले होते . गणेशोत्सवामुळे कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन 34 टक्के महागाई भत्तासह जानेवारी ते जुलै महिन्यार्पयंतची डी.ए फरकाची रक्कम अदा करण्यात आली आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए निर्णयानंतर देखिल अनेक आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता तसचे डी.ए फरक अदा करण्यात आलेला नाही .ज्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना निधी अभावी माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतन देयकासोबत वाढीव डी.ए लाभ मिळालेला आहे . परंतु डी.ए थकबाकी मिळालेली नाही , अशा कर्मचाऱ्यांना डी.ए थकबाकी पुढील महिन्याच्या वेतन देयकासोबत म्हणजेच माहे सप्टेंबर महिन्याच्या देयकासोबत अदा करण्यात येणार आहे .त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे वाढीव महागाई भत्ता लागु झाला नाही . अशा कर्मचाऱ्यांच्या शालार्थप्रणालीमध्ये डी.ए वाढ करुन सदर त्रुटी दुर करुन माहे सप्टेंबर महिन्याच्या देयकासोबत थकबाकीसह वाढीव डी.ए लागु करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

वाढीव महागाई भत्ता व थकबाकी –

ज्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या वेतन देयकासोबत 34 टक्के दराने महागाई भत्ता तसचे थकबाकी अदा करण्यात आलेली नाही . अशाच कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्याच्या देयकासोबत वाढीव डी.ए व डी.ए थकबाकी अदा करण्यात येणार आहे . यामुळे जे कर्मचारी वाढीव डी.ए पासुन वंचित राहीले होते . अशा कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या देयकासोबत मोठा आर्थिक फायदा होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी