Spread the love

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने , राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एटी बसच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे .आता या निर्णयामध्ये आणखीण भर टाकुन राज्यातील इतर वयोगटातील नागरिकांना देखिल तिकीटामध्ये विशेष देण्यात आलेली आहे . याबाबत गृह विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.09.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .

या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर राज्यातील वयोवर्ष 65 ते 75 वर्षापर्यंतच्या नागरिकांना एटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सवलत अनुज्ञेय करण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे .सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे आधारकार्ड , निवडणुक ओळखपत्र , जन्मतारीख , रहिवासी पत्ता , पासपोर्ट , ड्राईव्हींग लायसन्स , स्मार्टकार्ड ही ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत .त्याचबरोबर राज्य / केंद्र शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिलेली ओळखपत्र देखिल ग्राह्य धरण्यात येणार आहे .

या राज्य शासनाच्या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एटी महामंडळाच्या बसेस मध्ये विशेष प्रवास सवलत मिळणार आहे . याबाबतचा गृह विभागाचा दि.06.09.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी