Spread the love

सध्या महागाईच्या काळामध्ये , गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागातील लोक गॅस वापराऐवजी स्वयंपाकासाठी परत चुल्हांचा वापर करु लागले आहेत . यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे ,त्याचबरोबर इंधनासाठी झाडे कापली जातात .परिणामी पर्यावरणावर याचा दुषित परिणाम होतो . यासाठी राज्य शासनाकडुन 100 %  अनुदानावर निर्धूर चुल वाटप योजना राबविण्यात येत आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे .

ग्रामीण भागातील लोकांचा असा भास झाला आहे कि , गॅसवरचे स्वयंपाक अधिक चविष्ठ लागत नाही .यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याचे अधिक पसंती देतात .यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याच्या समस्या विशेष: महिलांना श्वसनाचा त्रास वाढत आहे .यासाठी राज्य शासनाकडुन 100 टक्के अनुदानावर निर्धुर चुल वाटप करण्यात येत आहे .जेणेकरुन महिलांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल .ही योजना राज्य शासनाच्या महाप्रित पोर्टलद्वारे समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येते .या योजनाचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे या योजनेची वैशिष्ट्ये कोणते आहेत .ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता –

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसुचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे .
  2. केंद्र सरकारच्या उज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन योजनेचा लाभ मिळालेला नसावा .
  3. लाभ घेणारा लाभार्थी आर्थिक दृष्ट्या गरिब असावा .
  4. सदर योजनासाठी महिलांच्या नावे लाभ जाहीर करण्यात येईल .

या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये –

  • घरगुती चुलीमुळे मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होते ,या निर्धुर चुलीमुळे वायु प्रदुषणाला 100 टक्के आळा बसतो .
  • या निर्धूर चुलींमुळे महिलांचे आरोग्य व जिवनमान सुधारण्यास मदत होते .
  • निर्धुर चुलीमुळे जंगलतोडीस / झाडांची कटाई होणेस आळा बसतो .
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन आवेदन करण्याची मुफा आहे .
  • या योजने अंतर्गत निर्धुर चुल ही 100 टक्के अनुदानावर प्राप्त होते .

अर्ज कसा करावा .

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील निकष पुर्ण करणाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://maha-diwa.vercel.app/ या संकेतस्थळावर क्लिक करा व सविस्तर आवेदन करुन निर्धुर चुलीचा लाभ घेवु शकता .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी