Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 पासुन सातवा वेतन आयोग लागु करण्यात आलेला आहे .परंतु राज्यातील अनेक पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली नव्हती .सदर शासन निर्णयानुसार , अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आले आहेत . याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडुन दि.07.09.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .याबाबतचा नगर विकास विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

अकोला महानगरपालिका अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होते . सदर नगर विकास विभागाच्या निर्णयानुसार अकोला महानगरपालिकेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे .अकोला शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने दि.01 नोव्हेंबर 2021 रोजी केलेल्या ठराव क्र.01 अन्वये केलेल्या शिफारशीनुसार अकोला शहर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार निर्णयामध्ये नमुद अटी / शर्तींच्या अधिन राहुन सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आले आहेत .

सदर निर्णयामुळे अकोला शहर महागरपालिका अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळाला असल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . या संदर्भातील नगरविकास विभागाचा दि.07.09.2022 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202209071523211625 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी