Spread the love

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे शेतकऱ्यांच्या किसान सन्मान योजने अंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे .याबाबत केंद्र सरकारकडुन नविन आकडे समोर आलेले आहेत .यामुळे शेतकऱ्यांना PM किसान सन्मान योजना अंतर्गत मोठी रक्कम मिळु शकते . यामध्ये नेमकी किती रक्कम वाढणार व कधीपासुन वाढणार याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

या योजना शेतकऱ्यांसाठी चालु करण्यात आलेली आहे . परंतु केंद्र सरकारच्या असे निदर्शनास आले कि , या योजना अंतर्गत काही नोकरदार वर्गातील नागरिक देखिल लाभ घेत होते . त्याचबरोबर इतर योजनांचा लाभ घेणारे नागरकि जसे कि , श्रावणबाळ योजना असे दोन – दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना आता कोणत्या तरी एकाच योजनाचा लाभ घेता येणार आहे . यासाठी केंद्र सरकारकडुन PM किसान सन्मान योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडुन  E-KYC करण्यात आलेले आहेत . ज्या शेतंकऱ्यांचे E-KYC पुर्ण झालेले नाहीत , अशा शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे पुढील हप्ते अदा करण्यात येणार नाही .

E-KYC मुळे दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ एकाच योजनांचा लाभ घेता येईल त्याचबरोबर E-KYC मुळे या योजनांचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच होणार आहे .यामुळे या योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे केंद्र सरकारकडुन आकडेवारी जाहीर करण्यात आले आहेत . यामुळे शेतकऱ्यांना या योजना अंतर्गत वाढीव रक्कम अदा करण्याचा विचार केंद्र सरकारचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे .

2000/- रुपये ऐवजी 3,000/- हप्ता शक्य –

E-KYC मुळे निश्चितच लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे . यामुळे शेतकऱ्यांकडुन आता या योजने अंतर्गत सन्मान राशीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मोठी मागणी प्रामुख्याने उत्तर भारतातील शेतकरी करत आहेत .सध्या प्रतिवर्ष 6000/-रुपये वर्षातुन तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी 2000/- रुपये हप्ता याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात येते .

6000/- रुपये ऐवजी 9000/- प्रतिवर्ष –

शिवाय निवडणुका जवळ आल्याने , केंद्र सरकारकडुन या योजना अंतर्गत सन्मान निधी मध्ये केंद्र सरकारकडुन निश्चितच वाढ केले जावू शकते .म्हणजेच प्रतीवर्ष 6000/- रुपये ऐवजी यामध्ये वाढ करुन 9000/-रुपये प्रतीवर्ष सन्मान निधी रक्कम केले जावू शकते .यानुसार शेतकऱ्यांना 2000/- रुपये ऐवजी 3000/- रुपये प्रति हप्ता मिळेल .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी