Spread the love

कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा मोठा विचार असल्याचे दिसुन येत आहे . मिडीया रिपोर्टनुसार 2047 मध्ये भारत देशामध्ये सर्वात जास्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संख्या असणार आहे . म्हणजेच 2047 पर्यंत अनेक खाजगी / सरकारी क्षेत्रामधील कर्मचारी रिटायर होणार असल्याने , या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा काय उपयोग ?  असा प्रश्न पडत आहे . यामुळे आपला देशाच्या विकासाला गळती लागण्याची शंका निर्माण होत आहे .

त्याचबरोबर कर्मचारी भविष्य निधी योजना अंतर्गत सदस्य असणारे कर्मचारी 2047 मध्ये रिटायर होणाऱ्यांची संख्या खुप मोठी असल्याने , सरकारला पेन्शन अदा करण्यास मोठा आर्थिक खर्च एका विशिष्ट कालावधी मध्ये करावे लागणार असल्याने , रिटायमेंटचे वय वाढविण्याचा मोठा विचार सरकारचा असल्याचे समजते .सध्या भारतामध्ये सरकारी / खाजगी कंपनिमध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे .तर काही विभागामध्ये सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे आहे .भारतापेक्षा विदेशामध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अधिक आहे .युरोपिय युनियम देशामध्ये सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे तसेच इटली , डेनमार्क व ग्रीस मध्ये 67 आहे .

जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिका देशामध्ये , कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे 66 वर्षे आहे .जागतिक पातळीचा विचार केला असता भारतामध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी आहे . शिवाय कर्मचारी युनियन कडुन वारंवार सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी होते .काही वेळेस सरकारी कार्यालयमध्ये तज्ञ कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीनंतर देखिल सेवेमध्ये मुदतवाढ देण्यात येते , कारण त्या तज्ञ कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा व कौशल्याचा वापर काम सुरळीत व योग्य होण्यास मदत होते .

मिडीया आकडेवारी नुसार सन 2047 मध्ये भारतामध्ये 14 करोड वयोवृद्ध लोकांची संख्या असणार आहे . ही आकडेवारी जागतिक पातळीवर नंबर एक क्रमांकावर असणार आहे .यामुळे सेवानिवृत्तीचे वय इतर देशांप्रमाणे करणेबाबत सरकारचा मोठा विचार असल्याचे बाब मिडीया रिपोर्टनुसार समोर येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी