सन 2022 मधील राज्य कर्मचाऱ्यांची बदलीचे सुधारित धोरण ( मुद्दे व स्पष्टीकरण ) बाबतचा सुधारित शासन परिपत्रक निर्गमित. दि.08.09.2022

Spread the love

राज्यातील राजकीय सत्तांतरामुळे सन 2022 मधील बदली प्रक्रिया खुप लांबणीवर गेलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांकडुन बदली बाबत वारंवार पाठपुरावा होत असल्याने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडुन दि.08.09.2022 रोजी एक महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहे . याबाबतचा ग्रामविकास विभागाचा दि.08.09.2022 रोजीचा सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बदलीचे मुद्दा व स्पष्टीकरण सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे . सध्या राज्यातील सर्व जिल्हा परिषदा मधील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात येत असुन , या अनुषांगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दि.30.08.2022 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती .यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदलीसाठी संभाव्य रिक्त पदे यादी , जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे या मुद्दांवर चर्चा करण्यात आली .सन 2022 मधील बदली प्रक्रिया ह्या शासनाच्या संदर्भिय शासन निर्णय दि.07.04.2021 च्या सुधारित निकषानुसार राबविण्यात येणार आहे .

यासाठी जिल्हांतर्गत बदलीचे धोरण , त्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना त्याचबरोबर परीपत्रकामध्ये नमुद करण्यात आलेले मुद्दे व स्पष्टीकरणात्मक सुचना विचारात घेवून विहीत मुदतीत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . याबाबत ग्रामविकास विभागचा दि.08.09.2022 रोजीचा शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन परिपत्रक

Leave a Comment