Spread the love

राज्य शासन सेवेच्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणेबाबत ग्रामविकास विभागाकडुन आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत . याबातचा ग्रामविकास विभागाचा दि.09.09.2019 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाले आहे .सदर निर्णयामध्ये वित्त विभागाचा दि.07.10.2016 रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ घेण्यात आला आहे . याबाबतचा ग्रामविकास विभागाचा दि.09.09.2019 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

वित्त विभागाच्या दि.25.04.1988 व दि.05.02.1990 च्या शासन निर्णयान्वये कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी मुख्यालयी वास्तव्यास रहाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत नसल्याने ग्राम विकास विभागाने यामुळे सदरचे शासन निर्णयातील तरतूदीशी अधिक्रमित ठरत नाही .ग्रामविकास विभागाच्या दि.09.09.2019 रोजीच्या शासन निर्णयान्वसये ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी रहाण्याबाबत विहित केलेली शर्त काढून टाकण्यात आली आहे .परंतु पंचायत राज समितीने त्यांच्या 4थ्या अनुपालन अहवालातील प्रकरण 6 त्याचबरोबर 19 च्या अहवालातील पृष्ठ क्र.24 वरील केलेल्या शिफारसी नुसार जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक , शिक्षक व संबंधित आरोग्य कर्मचारी मुख्यालयी रहाण्यासाठी ठोक उपाययोजना करण्यात आली आहे .

या करीता राज्य शासन सेवेतील प्राथमिक शिक्षक , पदवीधर शिक्षक , मुख्याध्यापक , ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी , आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक यांना मुख्यालयी रहात असल्यासंबंधी ग्रापंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे .याबाबतचा ग्रामविकास विभागाचा दि.09.09.2019 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी