राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी मिळणार वाढीव 4 टक्के महागाई भत्ताबरोबर आणखीण दोन मोठे गिफ्ट !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र त्याचबरोबर निवृतीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2022 पासुन वाढीव महागाई भत्ता लागु करण्याच्या तयारीत आहे . नुकतेच केंद्र सरकारने AICPI  च्या आकडेवारी जाहीर झाल्यानंतर ,केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे .

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सदरचा वाढीव महागाई भत्ता जुलै 2022 पासुन लागु करण्यात येणार आले असुन , माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . यामुळे याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहे .सध्या 34 टक्के दराने डी.ए लागु असुन यामध्ये एकुण 4 टक्के वाढ लागु करण्यात येणार असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्य धर्तीवर 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु होणार आहे . शिवाय हा वाढीव महागाई भत्ता जुलै 2022 पासुन रोखीने डी.ए फरकासह लागु होणार आहे .यामुळे दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम दिवाळीआधीच अदा करण्यात येणार असल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे .त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची रक्कमेमध्ये वाढ करण्यात येणार आहे . यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबरोबर इतर दोन मोठे गिफ्ट मिळणार आहेत .

Leave a Comment