Spread the love

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, शासनामार्फत आपल्या ग्रामपंचायत मधील सरपंच वेगवेगळ्या योजना आपल्या गावांमध्ये राबवत असतो. काही योजना ह्या शेतकऱ्यांसाठी असतात. तर काही योजना या गावाच्या विकासासाठी असतात. म्हणजेच रस्ते, गटारी, पाण्याची सोय, लाईटीची सोय इत्यादी योजना ग्रामपंचायत मार्फत राबवल्या जातात. पण त्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचतात का?

ग्रामपंचायत व पंचायत समिती मधील योजनांची यादी बघा मोबाईल वरती

शेतकऱ्यांसाठी ती योजना असेल तर ती योजना आपल्यापर्यंत पोचली गेली आहे का? हे नक्की कसे समजायचे, काही वेळा कित्येक योजना ह्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात, तर माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो तुमच्या गावामध्ये मंजूर झालेल्या सर्व योजनाची यादी आपण आपल्या मोबाईल मध्ये बघू शकतो. त्यातून आपल्याला समजते ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना या मंजूर झालेल्या आहेत. त्या त्या योजनेस तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही सुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर ग्रामपंचायत मधील मंजूर झालेल्या योजना ची यादी कशाप्रकारे बघावे याच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेऊया. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा आपल्या शेतकरी बंधू भगिनी पर्यंत शेअर करावा.

यादीमध्ये आपल्याला नक्की काय काय बघायला भेटते

योजनेच्या यादीमध्ये आपण नक्की काय काय बघू शकतो, तर त्यामध्ये आपण गाय गोठा, फळबाग तसेच विहीर अनुदान, महाराष्ट्र शरद पवार ग्राम समृद्धी योजना, पंचायत समिती मधील लाभार्थी यांची यादी, तसेच सरकारी योजना, महाराष्ट्र योजना मधील लाभार्थ्यांची यादी, ग्रामपंचायत योजनेमधील लाभार्थ्यांची यादी अशा पंचायत समिती मार्फत व ग्रामपंचायत मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आपण त्या यादीमध्ये पाहू शकतो.

यादीमधील सर्व योजनेचा लाभ तुम्हाला भेटेल का?

मित्रांनो तुम्हाला असे वाटत असेल की या यादीमध्ये ज्या योजना आहेत त्या सर्व योजना चा लाभ आपल्याला मिळावा. तर तसे नसते त्या त्या योजनेसाठी ठरलेले पात्रता हे लाभार्थी घोषित करते. लाभार्थी जे असतील त्यांनाच त्या योजनेचा लाभ दिला जातो. तुम्ही कोणत्या योजनेस पात्र आहात ती पात्रता योजनेमार्फत ठरवली जाते व त्या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जातो. पण आपण त्या यादीमध्ये संपूर्ण मंजूर झालेला योजना म्हणजेच ग्रामपंचायत मार्फत व पंचायत समिती मार्फत मंजूर झालेल्या योजना याची यादी आपण बघू शकतो.

या शासकीय योजनांची यादी नक्की पहावी कशी

१) तर सर्वात प्रथम आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.

२) दिलेल्या लिंक वरती क्लिक केले की तुम्ही वेबसाईट वरती जाल

३) वेबसाईट वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी रिपोर्ट वरती क्लिक करायचे आहे

४) रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमची ग्रामपंचायत नक्की कोणती आहे ती त्यामध्ये निवडायचे

५) यासोबतच कोणत्या फायनान्शिअल वर्षामधील तुम्हाला योजनांची यादी बघायची आहे ते वर्ष निवडावे

६) यासोबत वेबसाईट मध्ये दिलेली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरायचे आहे आणि शेवटी ऑफ वर्क यावरती क्लिक करायचे ऑफर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मधील व पंचायत समिती मधील विविध योजना ची यादी त्या ठिकाणी दिसेल

ग्रामपंचायत व पंचायत समिती मधील विविध योजना ची माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या वरती आत्ताच क्लिक करा, विचारलेली संपूर्ण माहिती भरा व सर्व योजनेची माहिती बघा.

CLICK HERE

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी