Spread the love

राज्य शासन सेवेत 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना NPS योजना लागु करण्यात आलेली आहे , अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरच लागु करावी लागणार आहे .राज्य कर्मचाऱ्यांकडुन जुनी पेन्शनसाठी गेल्या 17 वर्षांपासुन संघर्ष चालुच आहे . आतापर्यंतचा संषर्घ हा सौम्य प्रकारचा होता , परंतु आता अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागु केल्याने , राज्य कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आहेत .आत्तापर्यात राजस्थान , झारखंड ,छत्तीसगड त्याचबरोबर हिमाचल प्रदेश व उडीसा राज्यांकडुन याबाबत सकारात्मक विचार असुन लवकरच जुनी पेन्शबाबत निर्णय घेतला जाणार आहे .

याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये, याचिका दाखल करण्यात आलेली असून या याचिकेवर अद्याप निकाल लागला नाही . परंतु अनेक राज्यांनी कर्मचारी हित लक्षात घेवून कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे . शिंदे सरकारने आमदार /मंत्र्यांना पेन्शन लागु करणेबाबतच्या पेन्शन विधेकाला तात्काळ मंजुर दिली .परंतु राज्य शासन सेवेत आयुष्यभर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत कोणतेही सकारात्मक पाऊले उचलली जात नाहीत .यामुळे आता राज्यातील कर्मचारी आपल्या हक्क , अधिकारासाठी शासन दरबारी आपली व्यथा मांडत आहेत .वारंवार आंदोलने /संप करुनही शासनाचे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष जात नसल्याने ,आता कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येवून राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत .

राज्य कर्मचारी बेमुदत संपाच्या तयारीत –

राज्यातील 2005 नंतर रुजु झालेले कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत असल्याची वृत्त समोर येत आहेत .दि.21.09.2022 रोजी राज्यातील कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . ही आंदोलनाची सुरुवात असुन , यानंतर राज्य शासनाकडुन जुनी पेन्शन बाबत सकारात्मक पाऊले नाही उचलल्यास , संपाची तिव्रता वाढविणार असल्याची , माहिती कर्मचारी संघनांकडुन देण्यात आली आहे .

यापुढे कर्मचारी एकत्र एका छताखाली येवून जुनी पेन्शन या एकाच मागणीसाठी लढत असल्याने , राज्य शासनास लवकरच जुनी पेन्शन योजना लागु करावी लागणार आहे .कारण राज्यातील सर्व संघटना , कर्मचारी एकत्र येवून आपल्या न्याय हक्कासाठी लढू लागले आहेत .हा लढा हक्क व अधिकाराचा असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावीच लागणार अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून येत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी