Spread the love

राज्य शासन सेवेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनाची थकबाकी त्याचबरोबर अशासकीय विशेष शाळा / कार्यशाळा इत्यादीची वेतनेतर थकबाकी अदा करण्यापुर्वी विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करणेबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन आज दि.13.09.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे .याबाबतचा सामाजिक व न्याय विभागाचा दि.13.09.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

कर्मचाऱ्यांची वेतन / वेतनेत्तर थकबाकीची रक्कम संबंधितांस नियमाप्रमाणे देय आहे किंवा नाही .याची खात्री करण्यापुर्वी सदर थकबाकीची रक्कम संबंधितांस नियमाप्रमाणे देय आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी शासनाची मान्यता घेणे या निर्णयानुसार अनिवार्य करण्यात आले आहे .यामध्ये न्यायालयीन निर्णयामुळे दिल्या जाणाऱ्या थकबाकीच्या प्रकरणांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे .शिवाय इतर कारणांमुळे दिली जाणारी थकबाकीची प्रकरणेसुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत .काही प्रकरणांमध्ये याचिका दाखल असल्यास अशा प्रकरणीची रक्कम मा.न्यायालयाचा निकाल प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांत आयुक्तालयामार्फत त्यांच्य स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

त्याचबरोबर थकबाकी किंवा इतर लाभ द्यावयाचे झाल्यास प्रस्ताव आयुक्तालयामार्फत पाठविताना त्यासोबत आर्थिक भारासह सादर करण्याचे आदेश सदर निर्णयानुसार देण्यात आले आहेत .याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202209131552549822 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी