राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी  आनंदाची दिलासादायक बातमी ! पगारामध्ये मिळणार मोठा आर्थिक लाभ .

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे . राज्यातील शासकीय , निमशासकी , सेवानिवृत्त व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे थकीत महागाई भत्ता व सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करणेसंदर्भात राज्य शासनाकडुन विशेष तरतुद करण्यात येणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणाार आहे .याबाबतची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात .

आत्तापर्यंत वित्त विभागाकडुन सातवा वेतन आयोगाचे तिन हप्ते अदा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित झाले आहेत .परंतु प्रत्यक्षात अनेक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता अद्यापर्यंत बाकी आहे .शासन निर्णय निर्गमित होवूनही कर्मचाऱ्यांना वेळोवेळी निधी अभावी लाभ मिळालेला नाही .यामुळे सातवा वेतन आयोगाचे पहिला व दुसरा हप्ता अदा करणेकामी 2500 कोटी रुपये निधींची तरतुद करण्यात येणार आहे .त्याचबरोबर जे कर्मचारी 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेले आहेत , व ज्यांचे एनपीएस खाते उघडण्यात आलेले नाही .अशा कर्मचाऱ्यांचे एनपीएस खाते तात्काळ उघडण्याचे आदेश वित्त विभागाकडुन देण्यात आले आहे . जेणेकरुन ज्यांचे सातवा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणे बाकी आहे , अशा कर्मचाऱ्यांना थकबाकी अदा करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही .

त्याचबरोबर राज्य शासनाने राज्य् कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2022 पासुन 34 टक्के करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना 34 टक्के डी.ए प्रत्यक्ष ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत , जानेवारी ते जुलै या कालावधी मधील डी.ए थकबाकीची रक्कम देखिल अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते .परंतु राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत /निवृत्तीवेतनासोबत 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळाला , परंतु महागाई भत्ता थकबाकीची रक्कम मिळालेली नाही . अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेतन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे .

यासाठी राज्य शासनाकडुन विशेष निधीची तरतुद करण्यात येणार आहे .सदरचा निधी केवळ डी.ए थकबाकी साठीच खर्च करता येणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना पगारामध्ये मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

Leave a Comment