Spread the love

देशातील शेतकरी व अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासना यांच्या संयुक्त विद्मानाने ही आम आदमी विमा योजना राबविण्यात येते . या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे या विमा योजनेचा विमा हप्ता अत्यंत कमी आहे . याचा हप्ता वार्षिक 200/- रुपये इतका असुन हा प्रिमियन रक्कम देखिल सरकारकडुन भरण्यात येते यामुळे ,सर्वसामान्य शेतकरी व अल्पधारक शेतकऱ्यांना ही योजना खुप लाभदायक ठरत आहे .

या योजनेची सुरुवात 02.10.2007 मध्ये केंद्रसरकारकडुन करण्यात आली असुन , यामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने वार्षिक 200/- रुपये हप्त्याचा 50 टक्के भरणा केंद्र तर 50 टक्के हप्त्याचा भरणा राज्य शासनाकडुन करण्यात येतो .या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविणे . कारण ग्रामिण भागामध्ये विमा विषयीचे महत्व जास्त परीचयाचे नसल्याने , सरकार मार्फतचा हा प्रिमियम भरला जातो .यामध्ये नैसर्गिक मृत्यु , अपघाती मृत्यु , पुर्ण / कायमस्वरुपी अपंगत्व , आंशिक अंपगत्व अशा बाबींसाठी विमा कवच मिळते . यासाठी नुकसानाच्या प्रमाणानुसार विमा कवच मिळते .

अ.क्रनुकसान प्रमाण / बाबीमिळणारी विमा रक्कम
01.अपघाती मृत्यु75,000/-
02.पुर्ण / कायमस्वरुपी अपंगत्व75,000/-
03.नैसर्गिक मृत्यु30,000/-
04.आंशिक अपंगत्व37,500/-

त्याचबरोबर लाभार्थ्याच्या इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या किमान 2 मुलांना दर महिन्याला 100/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते . ही योजना जीवन विमा योजना मार्फत राबविण्यात येते . या विमा योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या योजना अंतर्गत कोणताही प्रिमियम रक्कम भरण्याची आवश्यकता नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी