Spread the love

राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीसाठी राज्‍य शासनाकडुन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येते .सन 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनासाठी निधीचे वितरण करणेबाबत सहकार ,पणन व वस्त्रोद्योग विभागाचा दि.16.09.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य शासनाकडुन निर्गमित झालेला आहे .याबाबतचा दि.16.09.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुज्ञेय करण्याची घोषणा राज्य शासनाकडुन करण्यात आलेली होती .यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णत: परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत दि.27.07.2022 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकिमध्ये निर्णय घेण्यात आला होता .या योजने अंतर्गत 2350 कोटी इतकी रक्कम महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनासाठी मंजुर करण्यात येत आहे .

सदरचा निधी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना , महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ,अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन 2022-23 या वित्तीय वर्षांत उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून करण्याचे आदेश देण्यात आले आहे .याबाबतचा सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाचा दि.16.09.2022 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी