Spread the love

शेतकरी बंधू भगिनींनो, जर तुम्हाला कोणतेही पैसे खर्च न करता तुमच्या जमिनीचे किंवा शेताचे मोजमापन करायचे असेल तर आम्ही तुम्हाला एक सोपा पर्याय सांगू. हे मोजमापन तुम्ही तुमच्या मोबाईल ने करू शकता. जमिनीचे मोजमापन करण्याचे काय प्रक्रिया आहे? याबद्दल आज आपण सविस्तर माहिती बघूया. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करावा.

चला स्मार्टफोन वरून करूया जमिनीचे मोजमापन –

आजच्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्याला नवनवीन बदल दिसून येत आहेत. शेतीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी नवनवे बदल घडवून चांगल्या प्रकारे शेती करून चांगले उत्पादन घेतले आहे. सध्या याच नवनव्या बदलांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काम हे कमी वेळेत अगदी व्यवस्थितपणे करता येत आहे. मित्रांनो अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलच्या साह्याने तुमच्या जमिनीचे मोजमापन अगदी व्यवस्थितपणे करू शकता.

पूर्वीपासूनच आपल्याला माहित आहे की जमिनीची मोजणी करायची झाली तर आपल्याला खाजगी किंवा सरकारी मोजणी ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करावा लागतो, अर्जासाठी जी काही फी असेल ती फी भरून अर्ज करावा लागतो, फी भरून अर्ज केल्यानंतर ज्यावेळी ऑफिसमध्ये लोकांना वेळ असेल त्याचवेळी ते येणार, जोपर्यंत मोजणी आपल्या शेतापर्यंत येत नाही तोपर्यंत मोजणी ऑफिसच्या चकरा आपल्याला मारायला लागत होत्या, पण आता तुमच्या शेताची किंवा जमिनीचे मोजणी करायची झाली तर मोजणी ऑफिसमध्ये जायची गरज नाही.

मोबाईलने जमीन किंवा शेत कसे मोजायचे?

१) जमिनीचे मोजमापन करण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
२) मोजमापन करण्याचे सर्वात पहिली प्रक्रिया म्हणजे तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन एका एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे.
३) त्या एप्लीकेशन चे नाव आहे GPS क्षेत्र कॅल्क्युलेटर, हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे.
४) यानंतर एप्लीकेशन ओपन करावे मोबाईलच्या स्क्रीन वरती वेगवेगळे पर्याय आपल्याला दिसतील त्या पर्यायांपैकी सर्च पर्यायवरती क्लिक करून दिलेली माहिती त्या ठिकाणी भरायची आहे.
५) तुम्हाला तुमच्या जमिनीचे मोजमापन त्या ठिकाणी दिसेल, मोबाईल एप्लीकेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे एकेक प्रक्रिया पूर्ण करावी.

मोबाईल ने जमिनीचे मोजमापन करण्याचे फायदे

  • मोबाईल जमिनीचे मोजमापन केल्याने कोणताही खर्च करावा लागत नाही
  • मोबाईल जमिनीचे मोजमापन केल्यामुळे मोजणी ऑफिसच्या चकरा मारावा लागत नाहीत
  • आपल्याला पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या क्षेत्रावरचे मोजमापन आपण करू शकतो

तर मित्रांनो आपण आज या पोस्टमध्ये जमिनीचे मोजमापन हे मोबाईल वरून कसे करावे याबद्दल माहिती सांगितली आहे. या जमीन मोजणीच्या सोप्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही कोणत्याही क्षेत्राचे कितीही मोठे किंवा छोटे क्षेत्र असेल तरी क्षेत्राचे मोजमापन करू शकता हा लेख तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी