Spread the love

महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना , बक्षी समिती खंड – 2 अहवाल स्विकृत्ती इत्यादी बाबींवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची महत्वपुर्ण बैठक दि.21.08.2022 रोजी पार पडली असुन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबींवर सखोल चर्चा संघटनेच्या कार्यकारणी बैठकिमध्ये करण्यत आली आहे .याबाबत संघटनेच्या वतीने लक्षवेध दिन सादर करण्याचे ठरविले आहे . याबाबतचा पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहेत .सविस्तर प्रसिद्धी प्रत्रक खालीलप्रमाणे आहे .

शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना , बक्षी समिती खंड -2 अहवाल स्विकृत्ती , केंद्र सरकार प्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , अतिरिक्त कार्यभाराबाबत सन्मानजनक अतिरिक्त वेतन , तसेच शासकीय कार्यालयांची वाहन खरेदी मर्यादा वाढविणे इत्यादी जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत शासन प्रशासनाने अनेकदा बैठका घेवूनही अद्याप कोणतेही निर्णय झालेले नाहीत . याबद्दल अधिकारी / कर्मचाऱ्यांकडुन तिव्र नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे .अशा प्रलंबित मागण्यांवर शासनाकडुन ठोस निर्णय घ्यावा याकरीता महासंघामार्फत दि.27.09.202 राजी राज्यभरामध्ये लक्षवेध दिन पाळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे .

या लक्षवेधी दिना दिवशी दुपारी 1.30 ते 2.00 या वेळेमध्ये राज्यभरातील सर्व कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या बैठका संपन्न होणार असून शासन दरबारी आपल्या मागण्यांबाबत सर्वांशी चर्चा करुन राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , जिल्हा , विभाग आणि राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची बाबत पत्रामध्ये नमुद करण्यात आली आहे .याबाबतचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सविस्तर प्रसिद्धी पत्रक खालीलप्रमाणे आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी