Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्युज आली आहे . ती म्हणजे राज्यातील सर्व शासकीय इतर पात्र व निवृत्तीवेतधारक कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच वाढीव डी.ए व सातवा वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याची तयारी राज्य शासनाकडुन होत आहे . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणामध्ये मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे . याबाबतची नमकी काय अपडेट आहे , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

महागाई भत्ता 38%

केंद्र सरकारने महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ केल्याने , आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यापासुन 38 टक्के दराने डी.ए लाभ मिळत आहे . राज्यामध्ये सत्तांतर झाल्याने , केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डी.ए वाढ करुन कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट राज्य सरकारकडुन देण्यात येणार आहे .केंद्रीय कामगार विभागाकडुन ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर झाल्याने , महागाईचे दर वाढले असुन सदर आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ घोषित करण्यात आलेली आहे .सदरची डी.ए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जुलै 2022 पासुन डी.ए फरकासह लागु करण्यात येणार आहे .

सातवा वेतन आयोग फरकाची थकबाकी

राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना शासन निर्णय निर्गमित होवुनही सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता / दुसरा हप्ता अद्यापर्यंत अदा करण्यात आलेला नाही .यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या नाराजगी व्यक्त करण्यात आल्याने , दिवाळीपुर्वी ज्या कर्मचाऱ्यांचा पहिला / दुसरा / तिसरा हप्ता अद्यापर्यंत बाकी आहे . अशा कर्मचाऱ्यांना वरील नमुद हप्ते अदा करणेकरीता 2500/- कोटी निधी संचित करुन संबंधित विभागांना आहरीत करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी