Spread the love

शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास , त्यांच्या कुटंबावर येणारे आर्थिक संकटातुन दुर करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासन सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते .या अनुकंपा धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली असुन , याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.19.09.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . अनुकंपा धोरणामधील सुधारणा बाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

अनुकंपा धोरणामधील काही बाबींमध्ये सुधारणा करणे शासनाच्या विचाराधीन होती , अशा बाबींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे . गट – ड च्या प्रतिक्षासुचिवरील उमेदवाराने गट – ड च्या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यापुर्वी जर गट – क पदासाठी आवश्यक असणारी वाढीव शैक्षणिक अर्हता प्राप्त केली व त्यानुसार त्याने गट – क प्रतिक्षासुचित नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित कार्यालयास अर्ज सादर केल्यास , त्याचे नाव वर्ग – ड मधील नाव वगळुन वर्ग – क मध्ये नाव समाविष्ट करण्यात यावे .परंतु एकदा जर वर्ग – ड मधून नाव वगळून वर्ग – क यादीमध्ये नाव समाविष्ट करुन परत वर्ग – ड मध्ये नाव समाविष्ट करता येणार नाही .

गट – क मधील तांत्रिक अर्हता जसे कि , लिपिक टंकलेखक या संवर्गातील पदावर अनुकंपा नियुक्ती दिल्यानंतर दोन वर्षाच्या विहीत मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याची तरतुद आहे .त्याचबरोबर टंकलेखन अर्हतेबाबतचे वेळोवेळी केलेले नियम लागू राहतील .तसेच गट – क मधील लिपिक टंकलेखक या संवर्गा व्यतिरिक्त इतर वर्ग – क च्या अन्य संवर्गांना सेवाप्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणे ही अर्हता या निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे .

बेपत्ता झालेल्या शासकिय कर्मचाऱ्यांच्या कुटंबातील सदस्यांना सदर कर्मचारी सक्षम न्यायालयाने मयत घोषित केल्यानंतरच पात्र सदस्यांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय ठरेल .तसेच बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारास अनुकंपा नियुक्तीसाठीचे अर्ज करण्याची मुदत ही अनुकंपा धोरण नुसार वेळोवेळी केलैल्या नियमानुसार लागु असणार आहे .याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दि.19.09.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक -202209191801019007 ) खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी