Spread the love

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए बाबत मोठी आनंदाची बातमी आली आहे , ती म्हणजे केंद्र सरकारने डी.ए मध्ये 04 टक्के वाढ घोषित केली आहे . यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव दराने महागाई भत्ता मिळणार आहे . सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के दर प्रमाणे महागाई भत्ता मिळतो .यामध्ये 04 टक्के वाढ झाल्याने आता या कर्मचाऱ्यांना सुधारित 38 टक्के दर प्रमाणे डी.ए वाढ मिळणार आहे .

4% महागाई भत्ता वाढ –

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडुन जाहीर झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार टक्के मध्ये 4/5 टक्के डी.ए वाढ होणे अपेक्षित होते . AICPI च्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांचा डी.ए निश्चित करण्यात येतो . या आकडेवारीनुसारच डी.ए मध्ये 4 टक्के वाढ घोषित करण्यात आली आहे . महागाई भत्ता मध्ये 5 टक्के वाढ करण्याची मागणी कामगार युनियनकडुन होत होती . परंतु केंद्र सरकारने डी.ए मध्ये चार टक्के वाढ घोषित केली आहे .सदरचा 4 टक्के डी.ए वाढ माहे जुलै 2022 पासुन लागु करण्यात आला असुन , केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यांपासुन प्रत्यक्ष रोखीने मिळणार आहे . शिवाय जुलै ते सप्टेंबर या कालावधी मधील डी.ए फरक थकबाकी देखिल अदा करण्यात येणार आहे .

केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार डी.ए वाढ –

केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए मधील वाढ लागु करण्यात येते . नुकतेच राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी 2022 पासुन डी.ए वाढ लागु करण्यात आली असुन , सदरचा डी.ए वाढ माहे ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत रोखीने अदा करण्यात आला आहे . राज्यामध्ये भाजपा + शिवसेना ( शिंदे गट ) यांची सत्ता असल्याने , केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी डी.ए मध्ये वाढ करण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी