महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने 27 सप्टेंबर 2022 रोजी लक्षवेधी दिन आंदोलन करुन सरकारचे लक्ष्य वेधाण्यात येणार होते .यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते . सदर बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडुन विविध 17 मागण्या मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या .बैठकीमध्ये नमुद करण्यात आलेल्या मागण्या व बैठकीचे इतिवृत्त बाबत संघटनेच्या वतीने प्रसिद्धीप्रत्रक दि.19.09.2022 रोजी जाहीर करण्यात आले आहेत .याबाबतचे सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .
सदर बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतनत्रुटी , जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे .तसेच विविध खात्यातील बढती प्रक्रिया विनाविलंब करण्यात यावी .सातव्या वेतन आयोगातील वाहतुक भत्तासह इतर सर्व देय भत्ते लागु करण्यात यावे .सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांसाठी वाहन खरेदी अग्रिमाच्या कमा मर्यादेत वाढ करण्यात यावी .सातव्या वेतन आयोग थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे लवकर प्रदान करण्यात यावे .शासकीय सेवेत कार्यरत पती -पत्नी एकत्रित ठेवण्याच्या धोरणानुसार महसूल विभाग वाटप नियम 2021 च्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात यावी .सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदान केंद्राप्रमाणे 20 लाख रुपये करण्यात यावे .अशा विविध 17 मागण्यावर मुख्यमंत्री समवेत सखोल चर्चा करण्यात आली .
या मागण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेवू अशी ग्वाही मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे यांनी दिली आहे .तसेच या बैठकीअंती महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला लक्षवेधी दिन आंदोलनास स्थगिती देण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे .या संदर्भातील महासंघाचे प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे आहे .

- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जुनी पेन्शन लवकरच होणार लागू ! सरकारच्या वेगवान हालचाली !
- राज्य शासनाकडुन रजेसंदर्भात सुधारणा करण्यात आलेले महत्वाचे संकलित शासन निर्णय / अधिसूचना !
- सुधारित नियमानुसार विलंबाने प्रदान करण्यात येणारे वेतन / DA व इतर पुरक भत्ते व्याजासह प्रदान करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण GR !
- Earn Money : लागा तयारीला! घरबसल्या प्रति महिना मिळतील हजारो रुपये; फक्त तुमच्या घरामध्ये हे उपकरण बसवा !