Spread the love

सतत बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना नेहमीच वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. निसर्गाचा लहरीपणा, अतिवृष्टी, मार्केटमधील बदलत राहणारे बाजार भाव अशा विविध समस्यांमुळे शेतकरी नेहमीच अडचणीमध्ये सापडत आहेत. पण सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आले आहेत. कारण येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे निराशा आपल्याला सामान्य नागरिकांमध्ये बघायला भेटत आहे. कारण जेवणामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा कांदा हा महागणार आहे आणि हा कांदा सर्वसामान्यांच्या आटोक्याच्या बाहेर जाणार आहे.

कांद्याच्या दरवाढीचा अंदाज मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे व्यक्त करण्यात आला आहे. तो अंदाज म्हणजे यंदाच्या वर्षी कर्नाटक मध्ये कांदा हा काढणीला आलेला होता, पण हाता तोंडाला आलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. म्हणजे कर्नाटक मधील काढणीला आलेल्या कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये कांदा कमी राहणार.

कांद्याच्या या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावरती होणार असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून कांद्याचा कमीत कमी दर हा 35 ते 40 रुपये आणि जास्तीत जास्त दर 50 ते 55 रुपये पर्यंत जाण्याची शक्यता दिसत आहे. पण काही ठिकाणी कांद्याला दर असून सुद्धा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे कांदा पिकाची नासाडी झाल्यामुळे या दराचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार नाही.

तुम्ही दरवर्षीचा आढावा घेतला तर गणेश उत्सवानंतर येणाऱ्या दसरा – दिवाळीमध्ये कांद्याचे दर हे कायम वाढलेले असतात. या काळामध्ये महाराष्ट्रातील कांद्याचा दर्जा हा परराज्यातील कांद्याच्या तुलनेत अधिक चांगला असतो.

मात्र सध्या बघायचे झाले, तर संभाव्य मागणी यासोबतच वाढीव मागणीचा विचार करत असता कांद्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कालखंडात मार्केटमध्ये जो कांदा जाईल त्याला चांगलाच दर मिळणार आहे. येत्या काळामध्ये कांदा हा कमीत कमी 35 ते 40 रुपये किलो जास्तीत जास्त 50 ते 55 रुपये किलो पर्यंत राहील. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच लाभ होईल पण, सर्वसामान्यांच्या केसाला नक्कीच फटका बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी