शेत जमिन खरेदी -विक्री नियमांमध्ये मोठा बदल , शेतकऱ्यांची चिंता मिटली .

Spread the love

शेती जमिन खरेदी -विक्री नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे . जमिन महसुली नियमांमध्ये बदल केल्याने लाखो शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे .सदरचा नियम जमिन खरेदी -विक्रि महसुली कायदा तुकडेबंदी -तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा 1947 मध्ये बदल करण्यात आलेला आहे .यामुळे शेतकऱ्यांना आता बागायती जमिनीसाठी व जिरायती जमिन यानुसार नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे .

या नविन नियमांनुसार जिरायती जमीन खरेदी – विक्रिसाठी किमान 20 गंठे तर बागायती जमीन खरेदी – विक्रिसाठी किमान जमिन 5 गुंठ्याची मर्यादा लागु असणार आहे .याबाबतचा प्रस्ताव महसुल विभागाकडुन राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे .जमिन खरेदी – विक्रि प्रसंगी वादविवाद होत असल्याने , राज्य सरकारकडुन सदर जमिन खरेदी – विक्रि नियमामध्ये बदल करण्यात आला आहे .शिवाय जिरायत जमीन दोन एकरापेक्षा कमी असल्यास खरेदी -विक्री प्रसंगी जिल्हाधिकारी / प्रांत अधिकारी यांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे .

शिवाय एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमिन विक्रि करायची असल्यास बागायती जमिनीची मर्यादा 20 गुंठे करण्यात आली आहे .परंतु दोन एकराच्या गटामधील पाच -सहा गुंठे जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार नाही .या संदर्भातील प्रस्ताव महसुल विभागाने राज्य सरकारला सादर केला असून या संदर्भातील अंतिम निर्णय पुढील महिन्यात होवून , या निर्णयावर अंमलबजावणी सुरु होईल .

Leave a Comment