राज्यातील सन 202-23 वर्षामधील सार्वत्रिक बदली प्रक्रिया अद्याप पर्यंत पुर्ण झालेली नाही . याबाबत राज्याचे मुख्यंमंत्री ना . एकनाथ शिंदे यांनी एक महत्वपुर्ण माहीती दिली आहे . सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रशासकीय व विनंती बदली यामधील बदलेल्या निकषानुसार बदली करण्यात येणार असुन , तुर्तास बदली प्रक्रियेस स्थगिती देण्यात आलेली आहे .
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला असता , त्यांनी सांगितले कि ,ज्या कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीसाठी आवेदन सादर केले आहे . अशा कर्मचाऱ्यांच्या बदलीस स्थगिती देण्यात आलेली नाही .असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री यांनी दिले आहे .शासकीय कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी बदली प्रक्रिया माहे एप्रिल व मे महिन्यामध्ये पुर्ण होतात . राज्यातील सत्तांतर झाल्याने , शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस दोन वेळेस स्थगिती मिळाली असल्याने , कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी व्यक्त केली जात होती . परंतु मुख्यमंत्री यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये , विनंती बदलीस स्थगिती देण्यात आलेली नसल्याने , कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे .
त्याचबरोबर पदोन्नती संदर्भातील प्रस्ताव प्रलंबित न ठेवता त्यावर तात्काळ निर्णय घेवून अधिकारी – कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पदोन्नती देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत .पदोन्नतीचे निकष पुर्ण करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी कोणतीही दिरंगाई न करता पदोन्नतीच्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडुन देण्यात आलेले आहे .
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जुनी पेन्शन लवकरच होणार लागू ! सरकारच्या वेगवान हालचाली !
- राज्य शासनाकडुन रजेसंदर्भात सुधारणा करण्यात आलेले महत्वाचे संकलित शासन निर्णय / अधिसूचना !
- सुधारित नियमानुसार विलंबाने प्रदान करण्यात येणारे वेतन / DA व इतर पुरक भत्ते व्याजासह प्रदान करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण GR !
- Earn Money : लागा तयारीला! घरबसल्या प्रति महिना मिळतील हजारो रुपये; फक्त तुमच्या घरामध्ये हे उपकरण बसवा !