Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.22.09.2022 रोजी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .दोन्ही शासन निर्णय वित्त विभागाडुन निर्ममित झाले असून ,सदर निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2022 संदर्भात सुचना निर्गमित करण्यात आले आहेत .तसेच सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर -2 मधील जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबतची कार्यपद्धती निर्गमित करण्यात आली आहे .या संदर्भातील वित्त विभागाकडुन निर्गमित झालेले दोन्ही शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम 2022 बाबतचा शासन निर्णय –

सुधारित वेतन स्तरानुसार वेतननिश्चिती करताना पुर्वीच्या असुधारित वेतनस्तरातील वेतनापेक्षा कमी वेतन निश्चिती होत असल्यास अतिप्रदानाची वसुली क्षमापित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .यानुसार एस -27 रुपये 123100-215900/- या सुधारित वेतनस्तरानुसार वेतननिश्चिती करताना असुधारित वेतन स्तरातील वेतनापेक्षा कमी वेतन निश्चित होत असल्यास , दि.01.01.2016 ते 28.04.2022 या कालावधीतील अतिप्रदानाची वसुली करण्यात येवू नये .असा महत्वपुर्ण निर्णय वित्त विभागाकडुन दि.22.09.2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .या संदर्भातील शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 02209221727344105 ) डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE

NPS कर्मचाऱ्यांच्या स्तर -2 मधील जमा रकमांचे व्याजासह प्रदान करणेबाबत GR

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS ) योजनेमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या 6 व्या वेतन आयोगाच्या स्तर -2 मधील जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करणेबाबतची कार्यपद्धती संदर्भात वित्त विभागाकडुन महत्वपुर्ण शासन निर्णय दि.22.09.2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .या सदंर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202209221153112105 ) डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी