स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी अग्रणी बँक आहे . या बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणुन विविध योजना राबविण्यात येतात .जसे कि , ग्रामिण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याची पाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये विविध उपाययोजना राबविण्यात येतात .तसेच ग्रामपंचायतीच्या सर्वांगिण विकासाठी ग्रामपंचायती दत्तक घेवून विकास कार्यक्रम राबविले जाते . याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी SBI फाऊंडेशनच्या वतीने SBI ASHA SCHOLARSHIP योजना राबविण्यात येत आहे .
SBI ASHA SCHOLARSHIP योजनेची पात्रता / निकष –
इयत्ता 6 वी ते 12 मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घेवू शकतात .त्याचबरोबर लाभ घेणारा विद्यार्थी हा भारतीय असणे आवश्यक आहे .तसेच अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षामध्ये किमान 75 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे . त्यापेक्षा कमी गुण मिळाले असल्यास , सदर शिष्यवृत्ती योजनेस पात्र ठरणार नाही .त्याचबरोबर अर्जदाराच्या पालकांच्या मागील वर्षाचे वार्षिक उपन्न 3,00,000/- रुपयांपेक्षा अधिक असु नये .त्याचबरोबर अर्जदाराचे नियमित शिक्षण सुरु असले पाहीजे .
अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागतपत्रे –
- ओळख पुरावा – आधार कार्ड
- मागील इयत्तेमधील गुणपत्रिका ( मार्कशीट )
- चालु शैक्षणिक वर्षाचे प्रवेशपत्र / बोनाफाईट
- बँक पासबुक
- पालकाचे उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईट फोटो
शिष्यवृत्ती आर्थिक स्वरुप – सदर वरील अटींची पात्रता पुर्ण करणाऱ्या तसेच विहीत नमुन्यात व विहीत कालावधी मध्ये अर्ज सादर करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यास – 15,000/- रुपये शिष्यवृत्ती लाभ देण्यात येते . शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येते .
अर्ज सादर करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/sbi-asha-scholarship-program या लिंकवर क्लिक करुन सविस्तर अर्ज सादर करु शकता .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 15.10.2022
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !