राज्य शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी .

Spread the love

राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्वाची बातमी समोर आलेली आहे .ती म्हणजे राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागणीबाबत पुढील महीन्यामध्ये निधींची तरतुद करण्यात येणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रलंबित थकित आर्थिक थकित प्रकरणे मार्गी लागणार आहे . कोणत्या थकित प्रकरणांवर निधींची तरतुद करण्यात येणार आहेत . या संदर्भाती सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .

महागाई भत्ता थकबाकी –

 राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषदा , निवृत्तीवेतनधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2022 पासुन 34 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आला आहे . हा वाढीव महागाई भत्ता प्रत्यक्ष माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात आलेला असल्याने , जानेवारी 2022 ते जुलै 2022 या सात महीने कालावधी मधील डी.ए थकबाकीची रक्कम माहे ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत वित्त विभागाकडुन शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आला असून देखिल अनेक विभागामधील कर्मचाऱ्यांना या सात महीने कालावधी मधील थकबाकी अदा करण्यात आलेली नाही . अशा कर्मचाऱ्यांना या कालावधीमधील डी.ए थकबाकी पुढील महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्यासाठी विशेष निधीची तरतुद राज्य शासनाकडुन करण्यात येणार आहे .

सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला / दुसरा / तिसरा हप्ता

राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन सातवा वेतन आयोगाचे पहिला / दुसरा व तिसरा हप्ता अदा करणेबाबत वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . परंतु अनेक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाही .यामुळे कर्मचारी संघटनांकडुन सातवा वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याची मागणी करण्यात आलेली होती . सातवा वेतन आयोगाचे पहिला / दुसरा / तिसरा हप्ता अदा करणेकामी पुढील महिन्यामध्ये 2500 कोटी रुपये निधींची तरतुद राज्य शासनाकडुन करण्यात येणार आहे .

यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीची रक्कम व सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते पुढील महिन्यात अदा होणार असल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

Leave a Comment