Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकिय तपासणी सुविधा बाह्य संस्थेमार्फत उपलब्ध करण्यास प्रशासकिय मान्यता देणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचा दि.23.09.2022 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे . सार्वजनिक आरोग्य विभागाचा या संदर्भातील दि.23.09.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासन सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष 40 ते 50 या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा तसेच वय वर्षे 51 व त्यावरील वयोगटातील सर्व शासकिय अधिकारी / कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकिय तपासणी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.22.04.20222 अन्वये अनुज्ञेय करण्यात आली आहे .वैद्यकिय तपासणी मध्ये नमुद काही वैद्यकिय चाचण्या शासकिय आरोग्य संस्थामध्ये उपलब्ध नाहीत . यामुळे अश्या उपलब्ध नसणाऱ्या चाचण्या बाह्य संस्थेद्वारे उपलब्ध करावयाच्या आहेत . यासाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रशासकिय मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव आयुक्तालयाकडुन प्राप्त झालेला आहे .

शासन सेवेत कार्यरत शासकिय अधिकारी / कर्मचारी यांना शासन निर्णय दि.22.04.2022 नुसार वैद्यकिय चाचण्या आरोग्य संस्थामध्ये उपलब्ध करण्याकरीता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.23.09.2022 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमुद अटींच्या अधिक राहून प्रशासकिय मान्यता देण्यात येत आहेत .या संदर्भातील सार्वजनिक आरोग्य विभागाचा दि.23.09.2022 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202209121059114517 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मराठी बातमी