7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन आणखीण 4% DA वाढ , आता मिळणार 38% दराने महागाई भत्ता !

Spread the love

सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी ब्रेकिंग न्युज आली आहे . ती म्हणजे सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना आता माहे जुलै 2022 पासुन 38 टक्के दराने डी.ए लाभ मिळणार आहे .महागाई भत्ता मध्ये तब्बल 4 टक्के वाढ होणार असल्याने , सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना डी.ए करुन दिवाळीची भेट सरकारकडुन देण्यात येणार आहे .

चार टक्के डी.ए वाढ व महागाई भत्ता थकबाकी

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडुन ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारकडुन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ निश्चित करण्यात आली आहे . AICPI च्या निर्देशांक माहे जुलै 2022 पर्यंत जाहीर करण्यात आलेले आहेत , सदर निर्देशांकाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये माहे जुलै 2022 आणखीण 4 टक्के वाढ करण्यात आली आहे . सदर वाढीव महागाई भत्ता केंद्रीय सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेतन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येणार असुन , सदर देयकासोबत माहे जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्याची डी.ए थकबाकीची रक्कम देखिल अदा करण्यात येणार आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना देखिल मिळणार केंद्राप्रमाणे डी.ए वाढ

सातव्या वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर , डी. ए वाढ करण्यात येते .केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल दिवाळी सणा अगोदर डी.ए वाढ लागु करण्याची शक्यता आहे .कारण राज्य कर्मचाऱ्यांकडुन वेळोवेळी विविध मागण्यांसाठी आंदोलने होत आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा लाभ लवकरच लागु करण्यात येईल .

Leave a Comment