शासकीय कर्मचाऱ्यांना मोटार वाहन / कार खरेदी करणेसाठी अग्रिमे मंजुर करणेबाबतचा सुधारित शासन निर्णय .

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना मोटार वाहन / कार खरेदी करण्यासाठी अग्रिमे मंजुर करणे संदर्भात राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडुन दि.11.03.2022 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . या निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित अटी व शर्तीच्या आधारे मोटार वाहन / कार खदेदी करण्यासाठी अग्रिमे मंजुर करण्यात येते .या संदर्भातील सुधारित शासन निर्णय ( GR ) पुढीलप्रमाणे पाहुयात .

शासकीय कर्मचाऱ्यांना मोटार वाहन / कार खरेदी करण्यासाठी अग्रिमे घ्यावयाचे असल्यास , सदर कर्मचाऱ्यास विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो .कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा कालावधीमध्ये मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमाचा लाभ एकाच वेळी अनुज्ञेय राहील .नविन मोटार सायकल अग्रिम लाभ घेतला असल्यास सदर अग्रिमाची वसूली 60 समान मासिक हप्त्यांमध्ये व्याजासह करण्यात येते .त्याचबरोबर स्कुटर अग्रिम 48 समान हप्त्यांमध्ये व्याजासह वसुल करण्यात येते . तर नविन मोटार कार खरेदी अग्रिमाची वसुली करताना प्रथमत: मुद्दलाची 100 समान मासिक हप्त्यात वसूल करण्यात यते .तर त्यानंतर व्याजाची वसूली 60 हप्त्यात करण्यात येईल .

नविन मोटार वाहन , अपंग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित तीन चाकी सायकल , स्कूटर , मोपेडचा विमा शासकीय विमा निधीकडे उतरविण्यात यावा व तो सतत चालू राहणे आवश्यक आहे .अग्रिमाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती पदाच्या सेवाभरती नियमानुसार झाली असावी , तसेच नियुक्तीनंतर कमीत कमी पाच वर्षांची सलग सेवा होणे आवश्यक आहे .सदर अग्रिमाचा लाभ अनुज्ञेय झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकामध्ये सदर अग्रिमाची नोंद घेणे आवश्यक आहे .

या संदर्भातील विधी व न्याय विभागाचा सुधारित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करुन सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करु शकता .

शासन निर्णय

Leave a Comment