राज्य कर्मचाऱ्यांच्या सण अग्रिम मर्यादेत वाढ करणे  संदर्भात महत्वपुर्ण पत्र निर्गमित .

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांच्या सण अग्रिम मर्यादेत वाढ संदर्भात एक महत्वपुर्ण पत्र निर्गमित झाले असून , कर्मचाऱ्यांना मिळणारा सण अग्रिम रक्कमेमध्ये वाढ करण्याची मागणी सदर पत्रामध्ये करण्यात आली आहे . राज्य सरकारी गट -ड ( चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी महासंघ ही एक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मोठी संघटना असून या संघटनेमार्फत दि.16.09.2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना राज्य कर्मचाऱ्यांच्या सण अग्रिम मर्यादेत वाढ करण्याची विनंती करण्यात आली आहे .याबाबतचा प्रसिद्धी पत्रक संघटनेमार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी / ईद सणानिमित्त सण अग्रिम देण्यात येते .अग्रिमाची वसुली कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन पुढील 10 समान हप्त्यांत करण्यात येते .ही सण अग्रिम रक्कम बिनव्याजी असल्याने , कर्मचाऱ्यांना सणासुदीला मोठा दिलासा मिळतो .कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पारंपारिक त्याचबरोबर धार्मिक सणांचा पुरेपुर आनंद घेता येतो .सध्या राज्यातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 12,500/- रुपये इतका सण अग्रिम मिळतो .परंतु सध्याच्या महागाईचा विचार केला असता , सणाला 12,500/- रुपये परवडणारे नसल्याने सदर अग्रिम रक्कमेमध्ये वाढ करुन 20,000/- रुपये इतके करण्याची मागणी संघटनेमार्फत करण्यात आली आहे .

दिवाळी सण अग्रिम मध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना सणासुतीच्या काळामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे .राज्य सरकारी गड -ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे जास्त सदस्य असल्याने सदर मागणीवर राज्य सरकारकडुन सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे . या संदर्भातील राज्य सरकारी गट -ड ( चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे दि.16.09.2022 रोजीचे प्रसिद्धती पत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment