राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 34 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे . सदरचा वाढीव डी.ए हा माहे ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात आला आहे . माहे ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत जानेवारी ते ऑगस्ट 2022 पर्यंत महागाई भत्ता थकबाकी अदा करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन आदेश देण्यात आले होते . परंतु काही विभागातील कर्मचाऱ्यांना निधी अभावी डी.ए थकबाकी अदा करण्यात आलेली नव्हती .
महागाई भत्ता थकबाकी व माहे सप्टेंबर 2022 च्या वेतनाकरीता अनुदान वितरीत करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा दि.26.09.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . वनामती प्रशिक्षण संस्थेच्या विनंतीनुसार सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता वनामती संस्थेस एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सहायक अनुदाने या उद्दीष्टाखाली माहे जानेवारी 2022 पासुन महागाई भत्ता थकबाकी व ऑगस्ट 2022 तसेच सप्टेंबर 2022 च्या वेतनाकरीता 8,27,400/- रुपये इतके अनुदान अर्थसंकल्पीय अंदाज 2022 च्या वेतनाकरीता 8,27,400/- रुपये इतके अनुदान अर्थसंकल्पीय अंदाज संनियंत्रण प्रणालीद्वारे संस्थेस निर्णयामध्ये नमुद अटी व शर्तीच्या अधिन राहुन निधी वितरीत करण्यात येत आहे .
त्याचबरोबर ज्या विभागामधील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधी मधील डी.ए थकबाकीची रक्कम मिळालेली नाही . अशा सर्व कर्मचाऱ्यांना डी.ए थकबाकीची रक्कम माहे सप्टेंबर महिन्याच्या देयकासोबत अदा करण्यात येणार आहे .थकबाकी अदा करणेसंदर्भात दि.26.09.2022 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडुन निर्गमित झालेला शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202209261111092507 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !