राज्य पोलिस विभागामध्ये 20,000 रिक्त जागेसाठी महाभरती : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा !

Spread the love

प्रसार माध्यमाशी संवाद साधताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायबर सिक्युरिटी, तुरुंगातील कैद्यांची अवस्था यावरती भाष्य केले. यासोबतच वेदांता प्रकल्पावरून विरोधकांना सुद्धा त्यांनी टोला लावला आणि पोलीस विभागातील भरती बाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली, ती माहिती देत असताना राज्यात 20 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय शासनाने हाती घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

20 हजार पोलिसांची (Police) भरती

प्रसार माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की. येत्या दोन वर्षांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. राज्यामध्ये लवकरच पोलिसांची भरती हे वीस हजार रिक्त पदांसाठी होईल. त्यामध्ये आठ हजार पदांची जाहिरात ही आधीच निघालेली असून, आता 12000 रिक्त पदांची जाहिरात लवकरच काढली जाईल. यावरती पोलीस विभागावरती जो पडत असलेला ताण आहे तो कमी होईल असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

कैद्यांसाठी खास सुविधा

यावेळी फडणवीस साहेबांनी कैद्यांबाबत सुद्धा महत्वाची बातमी दिली आहे. त्या बातमीमध्ये ते असे म्हणाले की राज्यामध्ये तुरुंग विभागात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. सध्या तुरुंगामध्ये 1641 कैदी आहेत त्यांची बेल झाली आहे पण बेल बोंड करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीत किंवा व्यक्ती नाहीत. त्यामुळे ते सध्या तुरुंगात आहेत. अशा कैद्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही एनजीओ ची मदत घेणार असून लवकर त्यावर ती तातडीने सुरुवात होईल. अशी माहिती त्यांनी दिली.

सायबर सेक्युरिटीबाबत निर्णय

या सोबतच राज्यामध्ये अनेक गुन्हे घडत आहेत. फिशिंगच्या माध्यमातून व इतर माध्यमातून लोकांना लुटले जात आहे. त्यांना त्रास सुद्धा दिला जात आहे. यासाठी शासन योग्य ती कारवाई करत असून लवकरच राज्यांमध्ये सायबर सिक्युरिटी रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहे. ही सगळी यंत्रणा हँडल करण्यासाठी जागृतीसाठी एक कंपनी देखील त्या ठिकाणी हाती घेणार आहोत अशी माहिती त्यांनी त्यावेळी दिली आहे .

Leave a Comment