राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 38 % महागाई भत्ता तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट !

Spread the love

महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ ही ए‍क राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची मोठी संघटना आहे . या संघटनेच्या वतीने दि.27.09.2022 रोजी लक्षवेध दिन म्हणुन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता . परंतु या दिनापुर्वीच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची दि.19.09.2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक संपन्न झाली होती .या बैठकीनंतर महासंघाने लक्षवेध दिन आंदोलन स्थगित केले आहे .

मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये , महासंघाच्या वतीने विविध मागण्या सादर करण्यात आल्या होत्या .या पार्श्वभूमीवर दिवाळी सणापुर्वीच बक्षी समिती खंड – 2 अहवालाची अंमलबजावणी , सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकार तसेच अन्य 25 राज्यांप्रमाणे 60 वर्षे करणे तसेच अधिकारी -कर्मचाऱ्यांची कौटुंबिक , आरोग्यविषय हेडसांड थांबविण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम 2021 लागु करण्यात येवू नये आदि महत्वाच्या मागण्यांबाबत प्राधान्याने निर्णय घेण्यात यावेत .तसेच अधिकाऱ्यांच्या असंतोषाची गांभिर्याने दखल घेण्यात यावी . केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या वाढीव 4 टक्के महागाई भत्ताबरोबरच इतर महत्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत विहित कालमर्यादेत निर्णय व्हावेत .अशी आग्रहाचे निवेदन देण्यात आले आहेत .

या निवेदनावर राज्य सरकारकडुन सकारात्मक निर्णय झाल्यास , राज्य शासन सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता तसेच सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षे वाढून मिळणार आहे .त्याचबरोबर ज्या अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये त्रुटी आहेत . अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात येईल .या संदर्भातील महासंघाचे प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment