GOOD NEWS : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अखेर 38 % महागाई भत्ताबाबत कॅबिनेट मंत्रिमंडाचा मोठा निर्णय ,जुलै 2022 पासुन 4% DA वाढ !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसांपासुन प्रतिक्षेत असणारा महागाई वाढ बाबत अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे .केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जुन महिन्यापर्यंत जाहीर करण्यात आले आहेत .सदर निर्देशांकाच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जाहीर करण्यात येत असतो . AICPI निर्देशांकामधील वाढल्यास ,निर्देशांकाच्या प्रमाणानुसार डी.ए जाहीर करण्यात येत येतो .

आज रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाची देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक संपन्न झाली .या बैठकीमध्ये विविध महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .यापैकी केंद्रीय सरकारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुन 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु करणेबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .जुलै 2022 पासुन 4 टक्के वाढीव महागाई भत्ता माहे सप्टेंबर महीन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत थकबाकीसह अदा करण्यात येणार आहे . सदरचा वाढीव महागाई भत्ता केंद्रीय पेन्शनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेनधारकांना विनाविलंब लागु करण्यात येणार आहे .

सप्टेंबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव 4 टक्के महागाई भत्ता त्याचबरोबर जुलै व ऑगस्ट महिन्यातील डी.ए थकबाकी अदा ककरण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .सदरचा वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील सरकारी तसेच इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आला आहे .

Leave a Comment