सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ ( काल्पनिक वेतनवाढ ) मंजुर करणेबाबत वित्त विभागाचे स्पष्टीकरण .

Spread the love

30 जुन रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ मंजुर करणेसंदर्भात वित्त विभागाकडुन स्पष्टीकरणात्मक पत्र निर्गमित करण्यात आले आहे .30 जुन रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही विभागामध्ये 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ मंजुर देण्यात आली आहे . परंतु सध्या वित्त विभागाकडुन 30 जुन रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलैची काल्पनिक वेतनवाढ मंजुर करणेबाबत स्थगित देण्यात आली असुन , याबाबत एक पत्र दि.25.08.2022 रोजी निर्गमित झाले आहे .

राज्यातील अनेक विभागातील 30 जुन रोजी सेवानिवृत्त झालेले / होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडुन 01 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी अशा मागणी करण्यात आली होती . सर्वोच्च न्यायालयाने याबाबत असा निर्णय दिला होता कि , कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षाच्या 01 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ मंजुर करण्यात येते .कर्मचाऱ्यांने वर्षभर काम केल्याने 30 जुन रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ मिळविण्याचा अधिकार आहे . परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सरकारकडुन रिट पिटीशन दाखल तसेच अनेक यासंदर्भात अनेक याचिका दाखल करण्यात आल्याने ,30 जुन रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 01 जुलै रोजीची वेतनवाढ बाबत कोणतेही स्पष्टीकरण सरकारकडुन देण्यात आले नाहीत .

सदर राज्य शासनाच्या  वित्त विभागाच्या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे कि , केंद्र शासनाने 01 जुलैच्या वेतनवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही ,असे आढळुन येते . यामुळे केंद्र शासनाच्या निर्णयानंतर सदरचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात येईल . असे स्पष्ट करण्यात आले आहे .यासंदर्भातील वित्त विभागचा दि.25.08.2022 रोजीचा पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment