दिवाळी तसेच ईद सणानिमित्त कर्मचाऱ्यांना सण अग्रिम तसेच बोनस जाहीर करण्यात येते .सदरची रक्कम बिनव्याजी असल्याने , कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळत असतो .सदर अग्रिम रक्कमाची वसुली कर्मचाऱ्यांच्या 10 समान हप्त्यामध्ये करण्यात येते .सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना 12,500/- रुपये दिवाळी सण अग्रिम जाहीर करण्यात येते .
राज्यातील महानगरपालिका अंतर्गत कार्यरत कर्मचारी , महापालिकेचे शिक्षक , तसेच बेस्टचे कर्मचाऱ्यांना यांना दिवाळी सणानिमित्त बोनस जाहीर करण्यात आले आहे .या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी 22,500/- रुपये बोनस जाहीर करण्यात आले आहे .त्याचबरोबर आरोग्य सेविकांना त्यांच्या मासिक पगाराच्या एक पगार दिवाळी बोनस म्हणुन म्हणुन जाहीर करण्यात आली आहे . या संदर्भातील अधिकृत्त घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली आहे .त्याचबरोबर मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्याचबरोबर अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देखिल बोनस जाहीर करण्यात आला आहे .
मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने , कर्मचाऱ्यांच्या बोनस मध्ये वाढ करुन कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडुन खुश करण्यात येत आहे .राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करुन म्हणाले कि , आनंदात दिवाळी साजरा करा .शिवाय कोरोना कालावधी मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले .
शिवाय राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा दिवाळी सण अग्रिममध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडुन करण्यात आली असल्याने , सरकारकडुन यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे . या मागणी मध्ये कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सण अग्रिममध्ये वाढ करुन 20,000/- रुपये अग्रिम मंजुर करण्यात यावा .असे नमुद करण्यात आले आहे .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !