राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतनाकरीता निधी वितरण करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित .GR दि.29.09.2022

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या माहे सप्टेंबर महीन्याच्या वेतन देयक अदा करण्यासाठी निधींची वितरण करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.29.09.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदरचा निधी हा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम , 2022 सन 2022-23 करीता नियोजित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाचा दि.29.09.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

वित्त विभागाकडुन अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .यानुसार राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन लेखाशिर्ष निहाय निधींचे वितरण करण्यात आले आहे .सदरचा निधी जिल्हा परीषद अंतर्गत येणाऱ्या शाळा महाविद्यालये , अध्यापक विद्यालये , कनिष्ठ महाविद्यालये , शासकीय परीक्षा मंडळे यांना अनुदानाच्या मागणीनुसार निधींचे वितरण करण्यात आले आहे .सदरचा निधी मागणीच्या लेखाशिर्षानिहाय वेतन , शालेय खर्च , इतर खर्च ,थकबाकी देयके ,क्रिडांगणंचा विकास ,बोलीभाषेतील पुस्तकांची निर्मिती करण्यासाठी संचित निधी वितरीत करण्यात आलेली आहे .

सदरचा निधी ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . त्याच लेखाशिर्षाखाली करण्यात यावे , अन्यथा वित्तिय अनियमितता समजण्यात येईल .या संदर्भातील शालेय शिक्षण विभागचा दि.29.09.2022 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment