राज्य शासन सेवेत दि.01 नोव्हेंबर 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना शेअर बाजारावर आधारीत केंद्र पुरस्कृत्त राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे . या योजनेचे मोठे नुकसान आता कर्मचाऱ्यांना सहन करावे लागत आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांकडुन राष्ट्रीय पेन्शन योजनेला मोठा विरोध होताना दिसत आहे .शिवाय राज्य कर्मचारी सन 1982-83 ची जुनी पेन्शन लागु करण्याची मोठी मागणी कर्मचाऱ्यांकडुन करण्यात येत आहे .
NPS धारक कर्मचाऱ्यांचे जमा रक्कमेच्या 9.35 % नुकसान
NPS धारक कर्मचाऱ्यांकडुन कपात करण्यात येणारी रक्कम राष्ट्रीय पेन्शन योजना टायर -1 मध्ये जमा करण्यात येते .सदरची रक्कम SBI PENSION FUND ,UTI PENSION FUND ,LIC PENSION FUND मध्ये गुंतवली जाते .सदरचे फंड हे जास्त जोखीमेचे नसले तरी , सदर फंडामधील 40 टक्के रक्कम शेअर बाजारामध्ये गुंतवणुक असल्याने कर्मचाऱ्यांना जोखिम पत्कारावी लागत आहे .सध्या शेअर बाजार निच्चांकी गाठत असल्याने , कर्मचाऱ्यांच्या एकुण परतावा मध्ये वजा 9.35 % परतावा मिळत आहे . म्हणजेच कर्मचाऱ्यांचे 9.35 टक्के नुकसान झाले आहे .शेअर बाजारामध्ये घसरण होत असल्याने कर्मचाऱ्यांना देखिल नुकसानीचा सामना करावा लागत आहे .
जुनी पेन्शन मागणीसाठी कर्मचारी आक्रमक
राष्ट्रीय निवृतीवेतन धारकांना जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ मिळत नाहीत , जसे कि सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान रक्कमेचा लाभ मिळत नाही . जुन्या पेन्शन योजनेमध्ये भविष्य निर्वाह खात्यामध्ये जमा रक्कम कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार काढता येत होती .परंतु NPS योजनेमध्ये तशी तरतुद करण्यात आलेली नाही .त्याचबरोबर जुन्या पेन्शन योजनेमध्ये भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा असणारी सर्व रक्कम कर्मचाऱ्यास मिळत होती . परंतु NPS योजनेमध्ये जमा रक्कमेवरच पेन्शन मिळते .यामुळे या NPS योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना अत्यल्प पेन्शन मिळते .यामुळे कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अधिक आक्रमक झाले आहे .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !