राज्य शासन सेवेत ग्रामीण भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी वेतनामध्ये घरभाडे भत्ता मिळत असतो . परंतु अनेक भागामधील नागरीक तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडुन वारंवार तक्रार होते कि , कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत .यामुळे या विषयाकडे आता प्रशासनाने ठोस पाऊले उचलले आहेत .जे कर्मचारी मुख्यालयी राहणार नाहीत . अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनामधुन घरभाडे भत्ताच थांबविण्याचे आदेश प्रशासनाकडुन निर्गमित करण्यात आले आहेत .
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश गटणे यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्र निर्गमित करुन निर्देश दिले आहे कि ,जे कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहणार नाहीत . अशा कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यांपासुन घरभाडे भत्ता थांबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .शिवाय जे कर्मचारी मुख्यालयी राहणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याचे आदेश औरंगाबादचे सी.ई.ओ श्री.निलेश गटणे यांनी दिले आहेत .यासाठी आता कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्रामसभेचा ठराव प्राप्त करुन घ्यावा लागणार आहे .त्याचबरोबर भाडेच्या जागत राहत असल्याचे भाडेकरार केल्याचे दस्तऐवजाची कागतपत्रे सादर करावे लागणार आहे .
शिवाय मुख्यालयी कर्मचाऱ्यांची उपस्थितीबाबत बायोमेट्रीक हजेरी तसेच आकस्मिक पडताळणी यारख्या बाबींचा अवलंब करण्याचे निर्देश सदर आदेशांमध्ये देण्यात आलेले आहेत .जे कर्मचारी मुख्यालयी वास्तव्य करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता रोखण्यात येणार आहेत .जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जिल्हा परिषद , जिल्हा सेवा नियम 1967 मधील नियम / अटी व शर्तीच्या तरतुदींचे भंग होणार नाही , याची दक्षता देणेबाबतचे सुचना देण्यात आलेल्या आहेत .
या संदर्भातील प्रशासनाने निर्गमित केलेले आदेश पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !