शेतकऱ्यांसाठी शासनाने राबवली आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना : शासकीय अनुदानावर मत्स्य पालन करून महिना,लाखो रुपये कमवा !

Spread the love

ग्रामीण भागामध्ये शेती पूरक व्यवसायात मत्स्य पालन हे एक महत्त्वाचे व उत्पन्नाचे मोठी साधन म्हणून उदयास आलेले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने या व्यवसायाकडे वळत आहे आणि मत्स्य व्यवसायाच्या योग्य नियोजनातून चांगला नफा मिळवत आहेत. शासन सुद्धा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा करत आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने पंतप्रधान मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना ही 2020 रोजी सुरू केलेली होती. मत्स्य व्यवसायातील शासनाने राबवलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मत्स्यपालनाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच मत्स्य व्यवसायासाठी कर्ज सुद्धा दिले जाते. जर तुम्हाला मत्स्य व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर सर्वात आधी तुमच्या क्षेत्रातील मत्स्य विभागाशी संपर्क करावा लागेल.

मत्स्य व्यवसायासाठी इतकी सबसिडी मिळवा

या शासकीय योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती मधील नागरिकांना व महिलांना मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास 60 टक्के अनुदान दिले जाते, यासोबतच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिता 40% पर्यंत अनुदान.

सादर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी अर्ज करावा लागतो त्याचा मार्ग हा खूपच सोपा आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना निर्देशित करण्यात आली आहे. कोणतीही इच्छुक व्यक्ती आपल्या राज्याच्या मत्स्य विभागाच्या वेबसाईट ला भेट देऊन सुद्धा या शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतील. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करा. खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा तुम्ही शासनाच्या वेबसाईट वरती जाल त्या ठिकाणी जाऊन अर्ज करा.

https://dof.gov.in/pmmsy

1.60 लाखाचे कर्ज हमीशिवाय घ्या

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून शेतकरी क्रेडिट कार्ड बनवून 1.60 लाख रुपये कर्ज घेऊ शकतात ते पण हमीशिवाय. यासोबतच या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कमाल तीन लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना घेता येत आहे. आणि किसान क्रेडिट कार्ड संबंधित एक महत्त्वाची बातमी म्हणजे, तुम्ही जर किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून कर्ज घेतले तर इतर कर्जाच्या तुलनेत तुम्हाला कमी व्याजदर त्या ठिकाणी द्यावा लागतो. म्हणजे थोडक्यात किसान क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढून घ्यावे व त्याचा नक्कीच फायदा घ्यावा.

Leave a Comment