महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान सन्मान योजना सुरु करण्याबाबत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे .या योजनेमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना 2 हजार रुपये ऐवजी 4 हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे .या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते निकष आहेत , अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत वर्षातुन तीन हप्त्यामध्ये , प्रती हप्ता 2,000/- रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य मिळते .सदरची रक्कम शेतकऱ्यांना कमी पडते .यामध्ये शेतकऱ्यांचे बी-बीयाणे , खतांचा देखिल खर्च भागवला जात नसल्याने , शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली आहे .या योजना अंतर्गत आता केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाप्रमाणे प्रतीवर्षी 6,000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल .यामुळे शेतकऱ्यांना एकुण 12,000/- इतके आर्थिक सहाय्य किसान सन्मान योजनेमधुन मिळणार आहेत .
CM किसान योजनेची पात्रता
- अर्ज सादर करणारा हा अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असणे आवश्यक आहे .
- अर्जदार शेतकऱ्याच्या नावे शेती असणे आवश्यक आहे .
- अर्जदार हा शासकीय सेवक किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसावा .
- अर्जदार शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत्त बँकेत खाते असणे आवश्यक आहे .
डिसेंबर मध्ये होणार सुरुवात –
मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेबाबतचा प्रस्तावाबाबत कामकाज सुरु असून ,हे प्रस्ताव लवकरच मंजुरी करण्यात येवून , येत्या डिसेंबर 2022 मध्ये सदर योजनेची सुरुवात करण्यात येईल .योजनेची सुरुवात झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !