राज्य शासकीय तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची दिलासादायक बातमी समोर आली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन 21 ऑक्टोंबरपुर्वीच अदा करण्यात येणार आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणामध्ये आर्थिक अडचण निर्माण होणार नाही .या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर महिन्याच्या देयकासोबत दिवाळी सण अग्रिम / बोनस अनुज्ञेय आहे .दिवाळी सण 21 ऑक्टोंबर पासुन सुरु होत असल्याने , कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी आर्थिक अडचण निर्माण होवू नये यासाठी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दरोडे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून कर्मचाऱ्यांचे वेतन 21 ऑक्टोंबर पुर्वीच अदा करण्याची मागणी केली आहे .याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन 21 ऑक्टोंबर पुर्वीच देण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे .त्याचबरोबर राज्य सरकारने शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांचे दिवाळीचे बंद करण्यात आलेले सानुग्रह अनुदान पुन्हा सुरु करण्याची मागणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .
केंद्र सरकारप्रमाणे वाढीव महागाई भत्ता ( DA )
केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता दिवाळीपुर्वी लागु करावी अशी विनंती परिषदेचे कार्यवाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे .त्याचबरोबर मुंबई महापालिकेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्यासाठी या वेळी शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे .
कर्मचाऱ्यांना दि.21 ऑक्टोबरपुर्वीच वेतन / पेन्शन दिवाळी बोनस / अग्रिम सह अदा करण्यात आल्यास कर्मचाऱ्यांना दिवाळी सणामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे .यापुर्वी गणपती उत्सवापुर्वी कर्मचाऱ्यांना वेतन / पेन्शन आहरित करण्यात आले होते .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !