राज्य शासन सेवेतील नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली , अहेरी व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील पोलिस ठाणी / पोलिस उपठाणी / सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालये येथे व अतिसंवेदनशिल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध शाखांमधील पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देणेबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाकडुन दि.03.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे .
नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत गृह विभागाच्या पोलिस अधिकारी / कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन व महागाई भत्ता देण्यात येणार आहे .यामध्ये पोलिस खात्यातील विविध शाखांचे अधिकारी / कर्मचारी अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत तैनात असेपर्यंत त्यांना करावे लागणारे जोखमीचे काम विचारात घेवून सदर कालावधीसाठी मिळत असलेल्या अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे .राज्य गुप्तवार्ता विभागतील अधिकारी /कर्मचाऱ्यांना राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कार्यरत असले तरी त्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय आहे . परंतु नक्षलग्रस्त भागामध्ये कामाचे स्वरुप लक्ष्यात घेवून राज्य शासनाकडुन सदरचा निर्णय घेण्यात आला आहे .
तसेच राज्यातील राज्य राखीव पोलिस बलातीमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना उक्त संवेदनशील भागात कार्यरत असतील तोपर्यंतच त्यांना दीडपट दराने अनुज्ञेय वेतन व महागाई भत्ता लागु असणार आहे .त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडुन नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना लागु केलेल्या इतर आर्थिक सवलती अनुज्ञेय असणार नाहीत .
सदरचा निर्णय वरील नमुद कर्मचाऱ्यांना दि.01.04.2022 ते दि.31.03.2023 या कालावधीच्या वेतनभत्यासाठी लागू असणारा आहे .याबाबतचा राज्य शासनाच्या गृह विभागाचा दि.03.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !