महाराष्ट्र राज्य शासन पोलिस दलातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना विशेर बाब म्हणुन नैमित्तिक रजा अनुज्ञेय करणेबाबतचा गृह विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.03.10.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील गृह विभागाचा दि.03.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
5 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षामध्ये 12 ऐवजी 8 नैमित्तिक रजा मंजुर करण्याचा निर्णय शासनाने घेतला व त्यानुषांने विशेष बाब म्हणून पोलिस दलामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका वर्षामध्ये 12 दिवस नैमित्तिक रजा गृह विभागाच्या दि.23.03.2000 रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय करण्यात आल्या आहेत .पोलिस दलामधील अधिकारी / कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता , आरोग्य व कौटुंबिक स्वास्थ या दृष्टीकोनातुन रजेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .या संदर्भात मा.मंत्रिमंडळाच्या मान्यतेने पोलिस दलामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे .
राज्य शासन सेवेतील पोलिस दलातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकारी / कर्मचारी यांना एका वर्षामध्ये देय असलेल्या 12 दिवसांच्या नैमित्तिक रजा ऐवजी जास्तीत जास्त 20 दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात येत आहे .या निर्णयामुळे राज्यातील पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना मोठा रजा सवलतीमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे . या संदर्भातील गृह विभागाचा दि.03.10.2022 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !