ऑक्टोंबर महिन्याच्या 24 तारेखेला दिवाळी सण असल्याने राज्य शासनाच्या सर्वच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन / पेन्शन दिवाळी सणापुर्वीच अदा होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ कोषागार अधिकारी , नागपुर कार्यालयाकडुन एक महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.03.10.2022 रोजी निर्गमित झाला आहे . या संदर्भातील कोषागार कार्यालयाची सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळीपुर्वी अदा करणे संदर्भातील शासन आदेश निर्गिमित होण्याची शक्यता असल्याने दिवाळीपुर्वी वेतन व सण अग्रिमाचे प्रदान होणे आवश्यक आहे . यासाठी ऑक्टोंबर 2022 महिन्यात दि.03.10.2022 ते 24.10.2022 या कालावधीत 8 दिवस शासकीय सुट्या सर्व शासकीय कार्यालये बंद असणार आहेत , व कामाचे फक्त 14 दिवस असल्याने या कामाच्या दिवसांमध्ये वेतन देयके , आकस्मित खर्चाची देयके , सण अग्रिमाची देयकांचे प्रदान कोषागार कार्यालयाला देयकाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे .
त्याचबरोबर दि.11.10.2022 ते 21.10.2022 या कालावधीत वैद्यकीय देयके , प्रवास भत्ता , रजा प्रवास भत्ता , स्वग्राम भत्ता , सेवानिवृत्तीनंतरचे स्वग्राम प्रवास भत्ता , जुन्या कालावधीची वेतन व भत्याची थकबाकीची देयके स्विकारण्यात येवू नये असे सदर परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महीन्याचे वेतन / पेन्शन दिवाळीपुर्वी सादर होण्याची शक्यता आहे .या संदर्भातील वरीष्ठ कोषागार कार्यालय नागपुर यांचे सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !