राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वीच ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत ,वाढीव महागाई भत्ता , सण अग्रिम / बोनसचा मिळणार लाभ !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषदा , तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्तीवेतधारक कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वीच सरकारकडुन मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे .केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के वाढ लागु केल्याने , केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एकुण 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे .

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ दिवाळी सणापुर्वी देण्यात यावा अशी मागणी राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडुन करण्यात आली आहे .त्याचबरोबर महाराष्ट्र विधानपरीषदेचे आमदार नागो गानार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले असुन , यामध्ये नमुद करण्यात आले आहे कि ,राज्य कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात यावा .विशेषत : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ लवकरात लवकर लागु करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे .

कर्मचारी संघटनांकडुन निवेदन देवून कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळी सणापुर्वीच म्हणजेच 21 ऑक्टोंबर पुर्वीच अदा करण्याची विनंती मा.मुख्यमंत्री यांना केली आहे .त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव सण अग्रिम देण्यात यावी अशी मागणी चतुर्थ श्रेणी वर्ग -4 कर्मचारी महासंघाकडुन करण्यात आली आहे .सदरच्या मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासने दिलेली आहेत .यावर राज्य शासनाने उचित निर्णय घेतल्यास राज्य कर्मचाऱ्यांना दि.21 ऑक्टोबरपुर्वीच वेतनासह वाढीव महागाई भत्ता , सण अग्रिम / बोनसचा लाभ मिळेल .

Leave a Comment